‘घाला छापा काढा काटा, लोकशाहीचा गळा घोटा, कमळ फुलण्या सर्वत्र, देश चिखलात लोटा’

Mumbai – कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) मातब्बर नेते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी बुधवारी सक्तवसुली संचलनालयाने (ED) छापेमारी केली. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला.

दुसरीकडे, ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले. शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअर समोर पेट्रोल पंपाच्या मागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका म्जुज सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई केली.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. घाला छापा काढा काटा, लोकशाहीचा गळा घोटा, कमळ फुलण्या सर्वत्र, देश चिखलात लोटा असं म्हणत टोला लगावला आहे.