Sachin Tendulkar Bodyguard | सचिन तेंडुलकरच्या बॉडीगार्डने संपवले आयुष्य, मध्यरात्री डोक्यात गोळी झाडून घेतला जीव

Sachin Tendulkar Bodyguard | क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) अंगरक्षकाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने आपले जीवन संपवले आहे. 37 वर्षीय अंगरक्षकाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. प्रकाश गोविंदा कापडे असे जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगर येथे राहणाऱ्या अंगरक्षकाचे नाव असून त्यांनी राहत्या घरी मध्यरात्री डोक्यात गोळी झाडून जीवनयात्रा संपवली.

37 वर्षीय प्रकाश कापडे हे एसआरपीएफमध्ये (Sachin Tendulkar Bodyguard) भरती झाले होते. त्यांच्या पोस्टिंगनंतर ते मुंबईत सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक म्हणून ड्युटीवर होते. कापडे हे आठ दिवसांपासून मुंबईहून गणपती नगर, जामनेर येथील त्यांच्या घरी आले होते. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी घरातील सर्वजण झोपले होते. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक त्यांच्या खोलीकडे धावले तेव्हा प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.

घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर प्रकाश कापडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तपास सुरू असून त्यानंतरच कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी आणि 2 मुले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप