सचिन वाझे दर महिन्याला ‘मातोश्री’वर 100 खोके पाठवायचा ; खासदाराच्या दाव्यामुळे खळबळ

बुलढाणा – बुलढाण्याचे (Buldana News) खासदार प्रतापराव जाधव यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) निशाणा साधताना केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांच्या वाळूच्या गाड्या पकडल्या आणि पत्त्यांच्या क्लबवर धाड पडली तर, वाईट काम असलं तरी आम्हालाच फोन करावा लागतो, असं वक्तव्य प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे कधी पोलीस ठाण्याची पायरी चढले आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे.

एवढंच नाहीतर सचिन वाझे दर महिन्याला ‘मातोश्री’वर 100 खोके पाठवायचा, असा गंभीर आरोपही त्यांनी ठाकरेंवर केला आहे. जाधव म्हणाले की, 50 खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असत. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट ठाकरेंवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.