Tendlya Movie | “इस्लामपुरातून मी पुण्यात आलो ते सचिन तेंडुलकर बनायला, मात्र २०१२ साली सचिन तेंडुलकर यांनी वनडे क्रिकेटमधून रिटायरमेंट घोषित केली, त्यावेळी माझी राज्यसेवा परीक्षेच्या केवळ मुलाखत बाकी होती आणि तरी मी एक भावनिक निर्णय घेतला. सचिनने आपल्याला आजवर इतकं दिलं तर आपणही त्याला काहीतरी द्यावं या भावनेने चित्रपटाची संकल्पना पुढे आली आणि मी ‘तेंडल्या’ बनवला,”असे चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी सांगितले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा( पीफ)मध्ये ‘तेंडल्या’ हा चित्रपट दाखवण्यात आला त्यानंतर जाधव यांनी या चित्रपटाचा प्रवास उलगडून सांगितला. जाधव म्हणाले, “मी सचिन तेंडुलकर यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यांना बघत मोठा झालो आणि त्यांच्यासारखे क्रिकेटमध्ये यावे असे वाटत होते. पण मी पुण्यात आलो तेंव्हा त्यांनी निवृत्ती घेतली. मग क्रिकेटर व्हायचे सोडले आणि सचिनसाठी चित्रपट करायचे ठरवले. त्यातून ‘तेंडल्या’ (Tendlya Movie) तयार झाला.
ते म्हणाले, “या चित्रपटातील ८० टक्के पात्रे ही माझ्या गावातीलच आहेत. चित्रपटात लहान मुलांची मोठी पलटन आहे, त्यासाठी मी इस्लामपूरच्या जवळील १०० जिल्हा परिषदेच्या शाळेतील ६००० मुलांमधून २० जणांची चित्रपटासाठी निवड केली. सोबत चित्रपटात १०० पात्रे असून, यातून जवळपास ७० लोकांनी कधी कॅमेराही पाहिलेला नव्हता, अशा परिस्थितीत चित्रपटाचं शुटींग सुरु केले. नवोदित दिग्दर्शक आणि नवोदित कलाकार यांना येऊन अनोखा चित्रपट बनवणे हे एखाद्या धाडसापेक्षा कमी नव्हते.”
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महायुती सरकारमध्ये वाद! एकनाथ शिंदें का सुरू करणार आहेत स्वतःचे वैद्यकीय मदत केंद्र
“मुंबईत न्यू इंडिया बँक लुटली त्याच्यात भाजपचे लोक”, संजय राऊत यांचा मोठा दावा
मुंबईत कोळसाभट्टीवरील तंदूर रोटीवर बंदी, BMCची कडक कारवाईचा इशारा