आम्ही मंडप सजवून ठेवलाय, योग्यवेळी बँड लावून अक्षदा टाकू – सदाभाऊ खोत

बुलढाणा : महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आलेले तिघेही हे दरोडेखोर आहेत, आणि त्यांनी टी-ट्वेंटी सारखे कमी वेळात जेवढे जास्त शासनाची तिजोरी कशी लुटता येईल याचा सपाटा त्यांनी लावला आहे. या तिघांचाही द्रोणाचार्य म्हणजे, शरद पवार हे बाजूला बसलेले आहेत. शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान आहे, असे वक्तव्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात च्या दौऱ्यावर आले असताना ते बोलत होते.

राज्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला होता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास टाकून सत्ता देखील दिली होती, मात्र लग्न ठरावे… साखरपुडा व्हावा… हळद लागावी… आणि अक्षदा पडण्याच्या वेळेतच नवरी मंडप सोडून पळून जावे; अशी स्थिती राज्यात निर्माण झाली असल्याची खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

नवरी पळून गेली आणि आमचा मंडप ओस पडला, मात्र अजूनही आम्ही मंडप मोडलेला नाही. अजूनही मंडप सजवून ठेवलेला आहे त्यामुळे योग्य वेळी बँड लावून आम्ही अक्षदा टाकू. असा टोला देखील सदाभाऊ खोत म्हणाले.

हे ही पहा 

https://www.youtube.com/watch?v=5wWKfxFFi5c

You May Also Like