श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेल्या सदावर्तेंना बिपिन रावत कोण हेते हेच नव्हते ठावूक; व्हिडीओ व्हायरल

मुंबई – सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह लष्करी आणि हवाई दलातल्या 11 अधिकाऱ्यांना बुधवारी दुपारी तमिळनाडुत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरमरण आलं होतं.  एका बाजूला अवघा देश रावत यांच्या निधनामुळे व्यथित झालेला असताना दुसऱ्या बाजूला वकील गुणरत्न सदावर्ते यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यामध्ये गुणरत्न सदावर्ते कोणाचं निधन झालं आहे असं विचारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये गुणरत्न सदावर्ते प्रसारमाध्यमांशी बोलण्याआधी मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला त्यांचं पूर्ण नाव काय होतं? अशी विचारणा करतात. यावर त्यांनी बिपिन रावत सांगितलं असता ते कोण होते? अशी विचारणाही ते करतात. यानंतर तिथे उपस्थित  तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख होते आणि त्यांच्या पत्नीही सोबत होत्या अशी माहिती देतात असे दिसून येत आहे.

यानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा बिपिन रावत हे नाव बरोबर आहे ना अशी खातरजमा करतात. यावर तिथे उपस्थित पुन्हा एकदा रावत यांच्याबाबत माहिती सांगतात. गुणरत्न सदावर्ते यांचा सर्व संवाद रेकॉर्ड झाला असून घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्यावर सोशल मीडियातून टीका होऊ लागली आहे. रावत यांच्या बाबत सदावर्ते यांना काहीही माहित नसल्याने अनेकजण रोष व्यक्त करत आहेत.हा व्हिडीओ आझाद मैदानावरील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.