‘देवमाणूस’मध्ये सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

'देवमाणूस’मध्ये सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!

Sai Tamhankar | ‘देवमाणूस’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो २०२५ च्या बहुचर्चित मराठी चित्रपटांपैकी एक ठरला आहे. तेजस देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या ‘लव फिल्म्स’ निर्मित, या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणूका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

नुकतीच या चित्रपटातील महत्वपूर्ण गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.

हे गाणे एप्रिलमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सई ताम्हणकरच्या चाहत्यांसाठी तसेच मराठी प्रेक्षकांसाठी ही एक विशेष भेट असणार आहे. पहिल्यांदाच सई मोठ्या पडद्यावर लोककला सादर करताना दिसणार आहे.

याबद्दल सई सांगते, “लव फिल्म्ससोबत काम करण्याची आणि ‘देवमाणूस’ परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करणे एक अविस्मरणीय अनुभव आहे. पहिल्यांदाच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन लावणी सादर करत आहे आणि माझ्या चाहत्यांनी व प्रेक्षकांनी ती पाहावी, यासाठी मी खूप उत्सुक आहे. आत्ताच फार काही सांगू शकत नाही, मात्र मी जे काही सादर करणार आहे, ते प्रेक्षकांसाठी एक नवीन आणि वेगळा अनुभव ठरेल, याची मला खात्री आहे!”

‘लव फिल्म्स’ प्रस्तुत ‘देवमाणूस’, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित आणि लव रंजन व अंकुर गर्ग निर्मित, हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

‘कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी, मुख्यमंत्री व मंत्र्यांची वर्तणूक संविधानविरोधी’

मुंबईतील फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद

शिवसैनिकांना कचरा समजणारे हाय व्होल्टेज शॉकमधून सावरले नाहीत; शिंदेंची उबाठावर खरमरीत टीका

Previous Post
निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी

निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी

Next Post
'कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या कामगारांच्या वारसाला 50 लाख रुपयांची मदत मिळेल असा कायदा करा'

‘कर्तव्यावर असताना मृत पावलेल्या कामगारांच्या वारसाला 50 लाख रुपयांची मदत मिळेल असा कायदा करा’

Related Posts
Bhaskar_Jadhav

संभाजी बिग्रेड आणि शिवसेना युतीचा भाजपने धसका घेतला आहे – भास्कर जाधव

मुंबई – शिवसेनेच्या (shivsena) नेतेपदी निवड होताच भास्कर जाधव यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्ला चढवला आहे. ज्याच्या खांद्यावर…
Read More

डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत

Diamond Clustre : डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईतील महापे येथे स्थापित होणार असून यामुळे २० हजार…
Read More
हे वागणं बरं नव्हे! सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला नाना पाटेकरांनी जोरात डोक्यात मारलं

हे वागणं बरं नव्हे! सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला नाना पाटेकरांनी जोरात डोक्यात मारलं

Nana Patekar Slaps Fan: चित्रपट अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या कणखर वृत्तीसाठी ओळखले जातात. काशीमध्ये जर्नी या चित्रपटाचे…
Read More