करिनासोबत लग्न करण्यापूर्वी सैफने पहिल्या पत्नीला लिहले होते पत्र; जाणून घ्या पत्रात काय होतं सांगितलं 

मुंबई – सैफ अली खान त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सैफ अली खानचे पहिले लग्न 1991 मध्ये अमृता सिंहसोबत झाले होते. या लग्नाने त्यावेळी बरीच चर्चा केली होती. याची दोन मोठी कारणे होती, एक म्हणजे सैफ आणि अमृता यांच्या वयात १२ वर्षांचे मोठे अंतर होते आणि दुसरे म्हणजे सैफने त्यावेळी बॉलिवूडमध्ये पदार्पणही केले नव्हते पण अमृता इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांपैकी एक होती. या लग्नापासून सैफ आणि अमृता यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले झाली.

लग्नानंतर बरेच दिवस सर्व काही ठीक होते पण त्यानंतर सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यात दुरावा वाढू लागला. याचा परिणाम असा झाला की 2004 मध्ये लग्नाच्या 13 वर्षानंतर सैफ आणि अमृताने घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. अमृता सिंगपासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफची अभिनेत्री करीना कपूरसोबतची जवळीक 2008 मध्ये वाढली होती, खरे तर दोघेही ‘टशन’ चित्रपटात काम करत होते आणि येथूनच त्यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुटला होता.

मात्र, काही वर्षे डेटिंग केल्यानंतर सैफ-करीनाने २०१२ मध्ये लग्न केले. मात्र, लग्नाआधी सैफ अली खानने पहिली पत्नी अमृता सिंगला एक पत्र लिहिले होते. हे पत्र अमृताला पाठवण्यापूर्वी करिनानेही वाचले होते, असे सांगितले जाते. या पत्रात सैफने अमृताला आपण करिनासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले होते, तसेच या पत्रात सैफने त्याच्या आणि अमृतासोबत घालवलेल्या चांगल्या काळांचा उल्लेखही केला होता. इतकंच नाही तर जेव्हा सैफने करिनाला दुसरी पत्नी बनवलं तेव्हा अभिनेत्याची मुलगी सारा अली खाननेही लग्नाला हजेरी लावली होती.