‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने दिग्दर्शक साजिद खानवर केला लैंगिक छळाचा आरोप

Mumbai: बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान (Sajid Khan) सध्या सलमान खान (Salman Khan) याच्या बिग बॉस शोमुळे (Big Boss) चर्चेत आले. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या साजिदवर एका-नंतर-एक अभिनेत्री गंभीर आरोप करताना दिसत आहेत. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी साजिदवर गंभीर आरोप केले असून त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीने त्याच्या लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ही अभिनेत्री बॉलीवूडची नसून मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आहे.

मराठमोळी अभिनेत्री जयश्री गायकवाडने (Jayashree Gaikwad) साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली आहे,”आठ वर्षांपूर्वी एका लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शकाने मला एका पार्टीत नेले होते. त्यावेळी सादिज खानशी माझी भेट झाली. त्याला भेटून अर्थात मला आनंद झाला”.

जयश्री पुढे म्हणाली, “त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी साजिदने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं. तो म्हणाला, तो एक सिनेमा बनवत असून त्यात मी मुख्य भूमिकेत असेन. ऑफिसमध्ये एन्ट्री केल्यापासून साजित मला स्पर्श करत होता. तसेच अश्लील कमेंट करत होता. त्यावेळी साजिद मला म्हणाला, फक्त अभिनय करून चालत नाही. मी सांगतो ते तुला करावं लागेल. त्यावेळी मी रागाने त्याच्या ऑफिसमधून निघून गेले”.

दहापेक्षा अधिक अभिनेत्रींनी साजिद खानवर आरोप केले आहेत. यात डिंपल पॉल, अभिनेत्री आहाना कुमरा, अभिनेत्री मंदाना करीमी, अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्रा, दिवंगत अभिनेत्री जिया खान आणि अभिनेत्री सिमरन सुरी त्याची एक्स असिस्टंट सलोनी चोप्रा अशा अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे.