Salman Khan Birthday: बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान 57 वर्षांचा झाला; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव 

Salman Khan Birthday: चाहत्यांचा लाडका सलमान खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमानचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्याचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. सलमानचा वाढदिवस स्पेशल बनवण्यासाठी त्याचे सर्व चाहते आधीच ४-५ दिवस सेलिब्रेशन मोडमध्ये आहेत. बिग बॉसच्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करण्यात आला.(Salman Khan Birthday: Bollywood’s ‘Bhaijaan’ Salman Khan turns 57; The fans showered their wishes).

27 डिसेंबर 1965 रोजी जन्मलेला सलमान खान त्याच्या चाहत्यांच्या हृदयात वास करतो. त्यामुळे तिथं बॉलिवूडमध्येही त्याचं नाणं चालतं. सलमान आज इंडस्ट्रीतील सर्वात महागडा कलाकार आहे यात शंका नाही. तो विलासी जीवन जगतो. पण कदाचित फार कमी लोकांना हे माहित असेल की बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानची पहिली कमाई 100 रुपयांपेक्षा कमी होती.

काय झालं? ऐकून धक्का बसला ना, पण हेच वास्तव आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सलमानने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की त्याची पहिली कमाई 75 रुपये होती. मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात त्याने बॅकग्राउंडमध्ये डान्स केला, ज्यासाठी त्याला 75 रुपये मिळाले. त्याचवेळी सलमानला त्याच्या पहिल्या हिट चित्रपट ‘मैंने प्यार किया’साठी 31 हजार रुपये फी मिळाली.

सलमानने सिने जगतला मैने प्यार किया, साजन, हम आपके है कौन, करण-अर्जुन, जुडवा, प्यार किया तो डरना क्या दिले. दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर, बजरंगी भाईजान (Dabangg, Bodyguard, Ek Tha Tiger, Bajrangi Bhaijaan) असे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. एकापाठोपाठ अनेक सुपरहिट चित्रपट देऊन सलमानने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे  विक्रम रचले.

सलमान आज करोडोंचा मालक आहे. अभिनेता असण्यासोबतच सलमान एक उत्तम बिझनेसमन देखील आहे. सलमान खानचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, ज्याचे नाव सलमान खान फिल्म्स (SKF) आहे. सलमानचा स्वतःचा ब्रँड देखील आहे, जो बीइंग ह्युमनच्या नावाने चालतो, जो खूप लोकप्रिय आहे. या सर्व गोष्टींतूनही सलमान बक्कळ कमाई करतो. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंटमधूनही सलमान करोडोंची कमाई करतो.