सलमान खान आहे तब्बल ‘एवढ्या’ कोटींच्या मालमत्तेचा मालक, मुंबईच नव्हे तर दुबईमध्येही आहे मालमत्ता

मुंबई – बॉलिवूडमधील सुपरस्टारपैकी एक असलेल्या सलमान खानने (Bollywood superstar Salman Khan) चित्रपटसृष्टीत ३३ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘मैने प्यार किया’ (Maine Pyar Kiya) या चित्रपटातून सलमान खानने नायक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चाहत्यांमध्ये भाईजानच्या नावाने प्रसिद्ध असलेला सलमान आज फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या स्टार्समध्ये गणला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान 3000 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला सलमान खानसोबत असलेल्या त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत आज करोडोंमध्ये आहे.

या यादीत पहिला क्रमांक या अभिनेत्याच्या घराचा आहे, ज्याला मुंबईचे ‘लँडमार्क’ (Landmark) म्हणता येईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान त्याच्या कुटुंबासोबत मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये ( Galaxy Apartment ) राहतो. हे तीन मजली अपार्टमेंट आहे ज्याची किंमत सुमारे 100 कोटी रुपये आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंट ही केवळ सलमान खानची मालमत्ता नाही. या अभिनेत्याचे महाराष्ट्रातील पनवेल येथे 150 एकरात पसरलेले फार्म हाऊस देखील आहे. बातम्यांनुसार, या फार्म हाऊसमध्ये सर्व सुविधा उपलब्ध आहेत, जसे की एक जिम, स्विमिंग पूल आहे, चांगली बाग आहे तसेच एक स्टेबल आहे.

एवढेच नाही तर सलमान खानची दुबईत ( Dubai ) एक आलिशान मालमत्ताही आहे. ही मालमत्ता दुबईच्या सर्वात पॉश एरिया, द अॅड्रेस डाउनटाउन, बुर्ज खलिफा (Burj Khalifa) जवळ आहे. बातम्यांनुसार, या मालमत्तेची किंमतही करोडो रुपये आहे. सलमान खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर त्यात ‘टायगर 3’ आणि ‘कभी ईद कभी दिवाळी’चा ( ‘Tiger 3’ and ‘Kabhi Eid Kabhi Diwali’ ) समावेश आहे.