आयपीएल लिलावात पैशांची उधळण झालेल्या सॅम करनची गर्लफ्रेंड काय करते? सौंदर्याची आहे खाण

आयपीएल २०२३च्या मिनी लिलावात १० फ्रँचायझींनी मिळून खेळाडूंवर पैशांची उधळण केली. त्यातही एमएस धोनीचा शिलेदार आणि इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करन याच्यावर विक्रमतोड बोली लागली.

सॅम करनला (Sam Curran) लिलावात विकत घेण्यासाठी जवळपास ५ संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. सॅम करन हा गोलंदाजी अष्टपैलू असून तो २ कोटी रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स अशा भरपूर संघांनी रस दाखवला. अखेर पंजाब किंग्जने सर्वाधिक १८.५० कोटींची बोली लावत त्याला ताफ्यात सामील केले. या रेकॉर्डब्रेक बोलीसह सॅम करन आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

सॅम करनने त्याच्या प्रेयसीसोबत (Sam Curran Girlfriend) बसून हा लिलाव पाहिल्याचे त्याने मुलाखतीत सांगितले. लिलावात कोट्यवधींमध्ये पैसे मिळवत सॅम करन तर चर्चेत आलाच पण त्याची प्रेयसी कोण आहे? त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसे आहे?, हे जाणून घेण्याची उत्सुकताही चाहत्यांना लागली आहे.

तर सॅम करनच्या गर्लफ्रेंडचे नाव इसाबेला सायमंड्स विल्मोट (Isabella Symonds Willmott) आहे. इसाबेला सायमंड्स विल्मोट २४ वर्षांची असून ती देखील लंडनची रहिवासी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅम करन आणि इसाबेला जवळपास ३ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या फोटोंमुळे हे दोघेही सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

इसाबेलाने इंग्लंडच्या एक्सेटर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांशी ती जोडलेली आहे. ती एक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर देखील आहे. ती अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते, जे खूप व्हायरल होतात. इसाबेला आयपीएलमध्ये सॅम करनला चीयर करताना दिसते. या जोडप्याला फिरण्याची खूप आवड आहे. अनेक क्रिकेट दौऱ्यांमध्ये ते एकत्र दिसतात.