राजे समरजितसिंह घाटगे यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर

कागल – कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांना साखर उद्योग गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.पुण्याच्या डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन कडून हा पुरस्कार जाहीर झाला आहे .श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून श्री घाटगे  यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे निवडीचे पत्र अध्यक्ष सोहन शिरगावकर यांनी पाठविले आहे.व हा पुरस्कार मिळलेबद्धल त्यांचे अभिनंदन केले आहे.

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात शनिवार तारीख 30 रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. सीएच्या उच्च शिक्षणानंतर   घाटगे  यांनी शाहू साखर कारखान्याची 2014 साली चेअरमनपदाची धुरा सांभाळली आहे. साखर उद्योग अनेक अडचणींना सामोरा जात असताना शाहू साखर कारखान्याने कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंह घाटगे  यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वाटचाल करीत असताना याची झळ शाहू साखर कारखान्यास बसु दिलेली नाही.

बदलत्या परिस्थितीनुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.घाटगे  यांच्या कारकिर्दीमध्ये कारखान्याचे यशस्वीपणे विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्प उभारणी, सभासदांच्या सोयीसाठी शाहू साखर ॲप असे उपक्रम राबवले आहेत. . या कारखान्यास नुकताच राष्ट्रीय साखर महासंघाकडून गत हंगाम 2020 -21 करिता उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री घाटगे यांच्या सहा वर्षाच्या कारकीर्दीमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरील 9 पुरस्कारांनी शाहू साखर कारखान्यास सन्मानित केले आहे.