चित्रपटातून उलगडणार रामदास स्वामींची गाथा, ‘रघुवीर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Pune- आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या महाराष्ट्रात अनेक थोर संतांपैकी एक संत म्हणजे “समर्थ रामदास स्वामी”. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ज्यांचं महत्वाचं स्थान होतं, योगदान होतं, असे रामदास स्वामी (Ramdas Swami) यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यावर आधारलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता त्यांची भूमिका साकारणार आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

समर्थ रामदास स्वामी यांचा चरित्रपट ‘रघुवीर’ (Raghuveer) आता लवकरच मोठ्या पडद्यावर अवतरणार आहेत. दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी रामदास स्वामींचे जीवनचरीत्र चित्रपट रूपात जगासमोर आणण्याचं शिवधनुष्य उचललं आहे. टेलिव्हीजनपासून चित्रपटांपर्यंत नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणारे अभिनेते विक्रम गायकवाड ‘रघुवीर’मध्ये रामदास स्वामींच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘रघुवीर’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर आलं आहे. समर्थ रामदास नेहमी जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत, त्यावरूनच हे नाव ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटात लोकप्रिय अभिनेते विक्रम गायकवाड मुख्य भूमिका साकारत आहेत. त्यांचा समर्थांच्या लूकमधील पहिला पोस्टरही प्रदर्शित करण्यात आला आहे. यात विक्रम ओळखूही येत नाहीयेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.