संभाजी भिडे सायकलवरुन पडले; खुब्याला दुखापत, रुग्णालयात केले दाखल

सांगली – शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide, the founder of Shiv Pratishthan) गुरुजी हे सायकलवरून पडून जखमी झाले आहेत. संभाजी भिडे यांना खुब्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी भारती रुग्णालयात (Bharti Hospital) दाखल करण्यात आले आहे. संभाजी भिडे सांगलीतील गणपती मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे समोर आलं आहे. (sambhaji-bhide-accident)

संभाजी भिडे नेहमी सायकलवरून प्रवास करतात. ते संध्याकाळी शहरातल्या गणपती मंदिराच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर सायकलवरून ते पुन्हा आपल्या घरी निघाले. मात्र याचदरम्यान काही अंतरावर गेले असता त्यांना अचानकपणे चक्कर आली आणि ते सायकलवरून खाली पडले. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी म्हटलं आहे.