औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात तुळजापूरात उद्या संभाजी ब्रिगेडचा विद्रोह मोर्चा

तुळजापूर – संभाजीनगर व धाराशिव नामांतराला विरोध करणाऱ्या व संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे फोटो (Photos of Aurangzeb) कार्यक्रमात लावून त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या शिवद्रोही खा. इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या विरोधात मंगळवार दि.१४ मार्च रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिर्थक्षेञ तुळजापूरात विद्रोह मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात स्वराज्यरक्षक छञपती संभाजीराजे प्रेमीनी मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन संभाजी ब्रिग्रेडने केले आहे.

या मोर्चासाठी संभाजी ब्रिग्रेडने जिल्हाभर रथाच्या माध्यमातून जनजागृती करुन विद्रोह मोर्चात सहभाग होण्याचे आवाहन केले होते. सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरण करून त्यावर शिक्कामोर्तब केला, असताना सुद्धा छत्रपती संभाजीनगर व धाराशिव या शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्या व संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे फोटो कार्यक्रमात लावून त्याचे उदात्तीकरण करणाऱ्या शिवद्रोही महाराष्ट्र द्रोही खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने हा मोर्चा आयोजित केला आहे.

विद्रोह मोर्चास सकाळी ११ वा स्वराज्यरक्षक छञपती संभाजीराजे यांच्या स्मारकापासुन आरंभ होणार आहे. तो तेथुन छत्रपती शिवाजी महाराज चौक भवानीरोड ते तुळजाभवानी मंदिर, महाद्वार रोड, तहसील कार्यालय रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छ. छत्रपती शिवाजी महाराज चौक असा या विद्रोह मोर्चा असणार आहे.
सदरच्या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असलेला रथ असणार आहे. या विद्रोह मोर्चास प्रशासनाने अनुमती दिली आहे.