मराठा जागर परिषदेचे अध्यक्ष प्रा. संभाजी पाटील यांचा सहकाऱ्यांसह भाजपामध्ये प्रवेश

मुंबई – मराठा जागर परिषद (Maratha Jagar Parishad) या संघटनेचे अध्यक्ष व युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. संभाजी दादाराव पाटील (Sambhaji Patil) यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश (Join BJP) केला. प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष मा. रामराव वडकुते, आ. तान्हाजी मुटकुळे व माजी खासदार शिवाजी माने उपस्थित होते.

प्रा. संभाजी पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) आंदोलनाच्या काळात मराठा समाजातील तरुणांमध्ये जागृती करण्यासाठी राज्यभर दुचाकी, चारचाकी वाहन यात्रा केल्या होत्या. त्यांनी मराठा आरक्षण, सारथी संस्था, वसतीगृहे या प्रश्नांसाठी उपोषण केले होते. प्रा. पाटील यांच्यासह त्यांच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि राज्यभरातील युवा कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला.