देशाची सेवा केली म्हणून जेलमध्ये टाकत असतील तर त्याला माझी तयारी – समीर वानखेडे

samir wankhede - nawab malik

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समीर वानखेडे यांना NCB मध्ये आणण्यात आलं. त्यानंतर ते सातत्याने बॉलिवूडच्या मागे लागले आहेत. कोरोना काळात जेव्हा अख्खं बॉलिवूड मालदिवमध्ये होतं तेव्हाच समीर वानखेडेही तिथे होते. त्यांचे कुटुंबीय होते. समीर वानखेडे तिथे खंडणी वसुलीसाठी गेले होते. समीर वानखेडे हे दुबईला का गेले होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांनी आर्यन खान विरोधात उभी केलेली केस हा बनाव आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातं आहे’ असे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले होते.

या आरोपांना आता समीर वानखेडे यांनी अतिशय आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. ‘वारंवार गेल्या 15 दिवसांपासून माझी मृत आई, माझे निवृत्त वडील आणि बहिणीवर घाण शब्दांमध्ये टीका केली जात आहे. मी या गोष्टीचं खंडन करतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करतोय. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटीड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो’, अशी आक्रमक भूमिका समीर वानखेडे यांनी मांडली आहे.

‘ते दुबईत गेल्याचं बोलत आहे. मी या गोष्टीची घोर निंधा करतो. ही चुकीची माहिती आहे. जी तारीख ते सांगत आहेत, डिसेंबर महिन्यात मी त्यावेळी मुंबईत होतो. ते या गोष्टीचा तपास किंवा शहानिशा करु शकतात. हा चुकीचा आरोप आहे. त्यांनी ट्विट केलेले फोटो मुंबईचे आहेत. जे खंरय ते खरं आहे. विमानतळाकडून तुम्ही माहिती घेऊ शकतात. याशिवाय पासपोर्ट, विझा या सगळ्या गोष्टी लागतात. मग वेरिफाय करुन बघा’, असं आवाहन वानखेडे यांनी केलं.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=3ugVGJoQwHo

Previous Post
स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’, १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर.

स्वरदा ठिगळे साकारणार ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’, १५ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर.

Next Post
samir wankhede - nawab malik (1)

खंडणी हा खूप घाणेरडा आणि खालच्या पातळीचा शब्द, वानखेडेंचा मलिकांना करारा जबाब !

Related Posts
भाजपा आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने अखेर दणका दिलाच

भाजपा आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने अखेर दणका दिलाच

मुंबई – भाजपा आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने दणका दिला आहे. शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी…
Read More
Fake Image आता सहज ओळखता येणार, गुगल इमेज सर्चचे दोन नवीन फीचर्स असे करतील काम

Fake Image आता सहज ओळखता येणार, गुगल इमेज सर्चचे दोन नवीन फीचर्स असे करतील काम

जर तुम्ही टेक कंपनी गुगलचे इमेज सर्च टूल (Google Image) वापरत असाल तर ही बातमी तुमच्या कामी येऊ…
Read More
twin tower

अवघ्या काही सेकंद अन् 32 मजली ट्विन टॉवर जमीनदोस्त, पाहा व्हीडिओ…

नोएडा –  नोएडाच्या सेक्टर 93A मधील सुपरटेक ट्विन टॉवर सीरियल ब्लास्टिंगने (Noida Supertech Twin Towers) जमीनदोस्त करण्यात आले…
Read More