मुंबई : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने अनेक धक्कायादक खुलासे केले आहेत. त्यात सर्वात धक्कादायक म्हणेज आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते.
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साईल यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे त्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी संजय राऊत यांनी केलीय. या पार्श्वभूमीवर आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई ड्रग्स प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं अडकवलं जात आहे. माझ्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ नये. आर्यन खान प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, असं पत्र समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालकांना लिहिल्यांची माहिती मिळत आहे. संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओनंतर उठलेल्या राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी पोलिस महासंचालकांना हे पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे.
हे देखील पहा
https://www.youtube.com/watch?v=Egi–9bLtao&t=1s