सॅम्युअल लिटल : अमेरिकेतील सर्वात धोकादायक सिरीयल किलर ज्याने 93 महिलांची हत्या केली

न्यूयॉर्क – आज आपण अमेरिकेतील सर्वात धोकादायक सिरीयल किलर सॅम्युअल लिटल (Serial Killer Samuel Little) बाबत जाणून घेणार आहोत.  ज्याने 1970 ते 2005 दरम्यान 93 महिलांची निर्घृण हत्या केली. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, सॅम्युअल हा एकेकाळी बॉक्सर (Boxer) होता, तो प्रथम लक्ष्यित महिलांना मुक्का मारायचा आणि नंतर त्यांचा गळा दाबून खून करायचा.

सीरियल किलर सॅम्युअल लिटल आता या जगात नाही, मधुमेह, हृदयरोग अशा अनेक आजारांमुळे वयाच्या ८० व्या वर्षी त्याचे निधन झाले. ग्रीन रिव्हर किलर गॅरी रिजवे (४९ खून), टेड बंडी (३६) आणि जॉन वेन गॅसी (३३) यांसारख्या कुख्यात मारेकऱ्यांपेक्षा लिटिलचा गुन्हेगारी रेकॉर्ड (Criminal Record) कित्येक पटींनी जास्त धोकादायक होता , त्यामुळे त्याने पॅरोलशिवाय सलग तीन जन्मठेपेची शिक्षा भोगली होती.

2012 मध्ये, दक्षिणेकडील केंटकी राज्यातील एका निवारा गृहातून लिटलला अंमली पदार्थांशी संबंधित आरोपांवर अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कॅलिफोर्नियाला प्रत्यार्पण करण्यात आले. त्याच्या अटकेपूर्वीच, लिटलचा संपूर्ण अमेरिकेत मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड होता, ज्यामध्ये सशस्त्र दरोडा ते बलात्कारापर्यंतचे गुन्हे होते.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सॅम्युअल लिटलने वयाच्या 30 व्या वर्षी 93 महिलांची हत्या केली. बहुतांश निर्घृण हत्यांमध्ये ५० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पीडितांची ओळख पटू शकलेली नाही. अनेक बळींचे मृतदेहही सापडले नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.एफबीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार , सॅम्युअलने सुरुवातीला त्याच्यावरील आरोप नाकारले, परंतु काही तासांच्या चौकशीनंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. सॅम्युअलच्या या कबुलीजबाबांचे व्हिडिओही यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. तसेच अशा अनेक खुनांची माहिती दिली, ज्यांची पोलिसांना फारशी माहिती नव्हती. याशिवाय सॅम्युअलने मारलेल्यांची रेखाचित्रेही बनवली होती.