Sandeep Deshpande: मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला 

Sandeep Deshpande  : मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande )यांच्यावर हल्ला झाला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांच्या शिवाजी पार्क येथे हल्ला झाला. हल्ला करून हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात देशपांडे गंभीर जखमी झाले आहेत.  ( Attack on MNS leader Sandeep Deshpande)

देशपांडे यांच्यावर हिंदूजा रूग्णालयात उपचाक सुरू आहेत. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा संशय आहे. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात हा हल्ला झाल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, संदीप देशपांडे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेची विद्यार्थी संघटना असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतून झाली. त्यावेळी विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे पाहायचे. त्यांनीच संदीप देशपांडे यांना महाविद्यालयीन निवडणुकीत संधी दिली आणि ते विजयी देखील झाले. 1995 मध्ये संदीप देशपांडे भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले.

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली तेव्हापासून ते आजपर्यंत संदीप देशपांडे मनसेत आहेत. ते नगरसेवक देखील होते.  ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात.