‘राज ठाकरे यांना शिवसेना पक्षाबाहेर घालवण्याचे कुभांड ज्यांनी रचलं त्यांच्यावर आता तिचं वेळ आली आहे’ 

Shivsena : शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला आहे. (The Central Election Commission has decided to give the name Shiv Sena and the symbol Dhanushyaban to the Shinde group) . हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर शिंदे गटाचा आनंद आता गगनात मावत नसल्याचे चित्र आहे.

दुसऱ्या बाजूला मनसेने देखील ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणाले, ‘ ज्या पद्धतीने राज साहेबांना (Raj Thackeray)पक्षाबाहेर जाण्याचं कारस्थान रचलं त्यांनाच पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. नियती तिचं वर्तुळ पूर्ण करत असते.

राज ठाकरे यांना शिवसेना पक्षाबाहेर घालवण्याचे कुभांड ज्यांनी रचलं त्यांच्यावर आता तिचं वेळ आली आहे. नियतीने बदला घेतला आणि सूड घेतला. आदित्य ठाकरे म्हणायचे संपलेल्या पक्षावर बोलत नाही. आता गर्वाचं घर खाली झालं आहे…तुम्हाला भावाला अडचणीत आणून कार्याध्यक्ष पद मिळालं. ते सांभाळता आलं नाही. मुख्यमंत्री पद सांभाळता आलं नाही. आता त्यांना उतरती कळा लागली आहे.  अशी टीका देशपांडे यांनी केली आहे.