दसरा मेळाव्याच्या वादात आता मनसेची उडी, राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : शिवसेनेमध्ये (shivsena) दोन गट पडल्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा रंगली आहे. एकीकडे शिवसेनेनं दसरा मेळावा (shivsena dasara melava 2022) होणारच असा दावा केला आहे. तर दुसरीकडे, मनसे सुद्धा या वादात उडी घेतली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाच दसरा मेळावा घ्यावा, अशी विनंती केली आहे. देशपांडे यांच्यासह आणखी काही नेत्यांनी देखील हीच मागणी आणि अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, ‘शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार की नाही होणार याबद्दल संभ्रम निर्माण केला जात आहे. संभ्रम वगैरे काहीही नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचाच होणार आहे आणि तो शिवतीर्थावर होणार आहे, असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले आहे.