बीडमध्ये क्षीरसागर काका-पुतण्यामध्ये पुन्हा संघर्ष;संदीप क्षीरसागर यांचा काकांवर भ्रष्टाचाराचा आरोप

Beed – राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (sandeep kshirsagar) यांनी त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (jaydutta kshirsagar) यांच्यावर नवगन शिक्षक प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेवर लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

सध्या शिवसेनेत आसलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची नवगण शिक्षण प्रसारक मंडळ नावाची शिक्षण संस्था आहे. याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयात कर्मचार्‍यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसूल करून मोठा भ्रष्टाचार केल्याचे आरोप संदीप क्षीरसागर यांनी केले आहेत.

संदीप क्षीरसागर यांनी उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा अशी मागणी केली आहे.