आदित्य ठाकरेंनी निधी देणे तर सोडा, पैठणला साधी भेटही दिली नाही; संदिपान भुमरे यांनी मांडल्या व्यथा 

संभाजीनगर –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक (Shivsainik) हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे.

अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे. एकाबाजूला बंडखोर नेत्यांच्या निशाण्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) असताना आता त्यांनी आपला मोर्चा आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे वळवला आहे.

माजी मंत्री तथा पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, माझ्या पैठण मतदारसंघामधील पर्यटन विकासासाठी मी आदित्य ठाकरेंना पाच-पाच पत्रे दिली, मात्र ते एकदाही भेटून त्याबद्दल बोलले नसल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे.

भुमरे म्हणाले की, मी पैठण मतदारसंघातील पर्यटन विकासासाठी पाच कोटींच्या निधीची मागणी केली होती. यासाठी आदित्य ठाकरेंना पाच-पाच पत्रे दिली. पण आदित्य ठाकरेंनी निधी देणे सोडा, पैठणला साधी भेटही दिली नाही. त्यांनी किमान दौरे तरी करायला हवे होते, असे भुमरे म्हणाले. तर उद्धव ठाकरे सुद्धा भेटण्यासाठी वेळ देत नव्हते असेही भुमरे म्हणाले.