Sangli Politics | कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले,त्यांना…; कदमांचे सूचक वक्तव्य  

Sangli Politics | सांगलीतील विधासभांच्या जागांवरून महाविकास आघाडीत संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. सांगलीत 3 जागा जिंकू आणखी एकाद दुसरी जागा मिळवू असं म्हणत,कामाला लागा अशा सूचना जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्यात. तर सांगलीतील विधानसभेच्या 5 ते 6 जागा लढणार, अशी घोषणाच काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) यांनी केलीय. कदमांच्या घोषणामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ते म्हणाले, सांगलीतील काँग्रेस (Sangli Politics) एकत्र करत सर्वांची आम्ही मूठ बांधली. आमच्यातील हेवेदावे सगळे विसरुन आम्ही एकदिलाने काम करण्याचा निर्णय घेतला. सगळी कटुता बाजूला ठेवत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि काँग्रेस नेत्यांसाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवली.

पुढे बोलताना ते म्हणाले, आमची झालेली ही एकजूट आणि आम्ही बांधलेली मूठ काहीजणांना बघवली नाही. तसेच काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले. त्यांना त्यांची जागा या लोकसभेत दाखवून दिली आहे. पुन्हा ते आपल्यामध्ये खडे टाकण्याचे काम करणार नाहीत.  पण आपली नेत्याची आणि कार्यकर्त्यांची एकजूट कायम राहायला हवी असे कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like