सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा सुखी संसार तुटला! घटस्फोटाबद्दल जवळचा मित्र म्हणाला…

Sania Mirza Shoaib Malik Divorce: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे जोडपे वेगळे झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. शोएब मलिकच्या एका जवळच्या व्यक्तीने यावर शिक्कामोर्तब करताना त्यांचा घटस्फोट झाला असल्याचे सांगितले आहे.

सानिया मिर्झा (Sania Mirza) ही जगप्रसिद्ध टेनिस स्टार आहे आणि शोएब मलिक(Shoaib Malik)  हे पाकिस्तान क्रिकेटमधील मोठे नाव आहे. ते इझान मिर्झा मलिक या मुलाचे आई-वडील आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दोघे वेगवेगळे राहात आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, सानिया मुलगा इझानसोबत दुबईत तर शोएब पाकिस्तानमध्ये राहात आहे.

या जोडप्याने नुकताच त्यांचा मुलगा इझान मिर्झा मलिकचा वाढदिवस साजरा केला, तेव्हा दोघांमधील अंतर सार्वजनिक होऊ लागले. शोएब मलिकने वाढदिवसानंतरच्या पार्टीचे फोटो शेअर केले, तर सानिया मिर्झाने तसे केले नाही. त्यानंतर सानियाने ‘ब्रोक हार्ट’ची पोस्ट शेअर केली. या पोस्टने सोशल मीडिया वापरकर्त्यांना चर्चा करण्यास प्रवृत्त केले की दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही.

याशिवाय सानियाने खडतर वेळेबद्दलची पोस्टही शेअर केली आहे. पाकिस्तानी रिपोर्ट्सनुसार, शोएब मलिकने एका शोच्या शूटिंगदरम्यान सानिया मिर्झाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. इझानच्या वाढदिवसाला हे दोघे बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले होते.

यानंतर आता शोएब मलिकच्या जवळच्या सहाय्यकाने याबाबत सांगितलं आहे की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक बऱ्याच काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. आता दोघांनी औपचारिकरित्या घटस्फोट घेतला आहे. शोएब मलिकच्या पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाचा सदस्य असलेल्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे.