‘हेरा फेरी ३’मध्ये संजय दत्त लगावणार कॉमेडीचा तडाखा, साकारतोय ‘ही’ मजेदार भूमिका

बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त (Sanjay Dutt) सध्या एकापेक्षा एक प्रोजेक्टचा भाग बनत आहे. काही दिवसांपूर्वी संजय शाहरुख खानसोबत ‘जवान’ चित्रपटात दिसणार असल्याची बातमी आली होती. यानंतर आता ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) या चित्रपटातही त्याची एंट्री झाल्याचे बोलले जात होते. आता बॉलिवूडच्या खलनायकानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

संजय दत्तने पुष्टी केली आहे की तो अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) स्टारर चित्रपट ‘हेरा फेरी 3’ चा भाग आहे. त्याने त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल तपशील शेअर केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना संजयने खुलासा केला आहे. मुलाखतीदरम्यान त्याला विचारण्यात आले की, ‘हेरा फेरी 3’ या सिनेमात तो एका अंध डॉनची भूमिका करतोय का? यावर संजय दत्तने ‘होय’ असे उत्तर दिले.

अभिनेत्याची भूमिका कशी असेल?
टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या चित्रपटात संजय दत्तची भूमिका खूप खास असणार आहे. हे पात्र फिरोज खानच्या ‘वेलकम’ चित्रपटातील आरडीएक्स या पात्रासारखे असेल. ‘हेरा फेरी 3’चे शूटिंग या वर्षी सुरू होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लॉस एंजेलिस, दुबई आणि अबुधाबी येथे होणार आहे.

काही काळापूर्वी संजय दत्त एक स्टोअर लॉन्च करण्यासाठी आला होता. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘होय, मी चित्रपट करत आहे. संपूर्ण टीमसोबत शूटिंग करणे मजेशीर असणार आहे. ही एक उत्तम फ्रँचायझी आहे आणि त्याचा एक भाग बनून मला आनंद होत आहे. फिरोज (निर्माता फिरोज नाडियादवाला) आणि माझे नातेही खूप जुने आहे. आणि अक्षय (कुमार), सुनील अण्णा आणि परेश (रावल) यांच्यासोबत काम करणे खूप छान होईल.’