संजय राऊत यांनी एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही ; सुनील राऊत यांचा दावा  

विक्रोळी – पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे सध्या चांगलेच अडचणीत आले आहे. मात्र त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी मात्र एक अजब दावा केला आहे. संजय राऊत यांनी एक रुपयाचाही भ्रष्टाचार (Corruption) केलेला नाही. त्यांची काहीच चूक नाही. देशातला कुठलाही वकीलाला विचारा.असं त्यांनी म्हटलं आहे.

माझ्याकडून चार्जशीट घेऊन जा… यांच्यावर एफआयआर होऊ शकतो, असं कुणीही म्हणणार नाही. पण जोपर्यंत भाजपचं राज्य आहे, हे होऊ शकत नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) यांनी केलंय.  संजय राऊत शंभर टक्के बाहेर येणार.त्यांनी कितीही अन्याय करू देत… ते बाहेर येतील आणि भाजपच्या अत्याचाराविरोधात शिवसेनेचा आवाज बुलंद करण्यासाठी ते लवकर बाहेर येतील.