ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंच्या सुपुत्रानेच ठाण्यातील गुंडांना दिली संजय राऊतांना संपवण्याची सुपारी?

ठाणे- गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे. अशातच आता संजय राऊत यांनी आपल्यावर हल्ला होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीच आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी काही गुडांना दिली असल्याची धक्कादायक माहिती संजय राऊत यांनी पत्राद्वारे दिली आहे. त्यांनी हे पत्र उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व ठाणे पोलिस आयुक्तांना लिहिले आहे.

त्या पत्रात पुढीलप्रमाणे उल्लेख आहे-

पत्रातील मजकूर असा-

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे – आपला नम्र- संजय राऊत