संजय राऊत म्हणजे ‘लवंडे’; राज ठाकरेंनी केली जोरदार धुलाई

ठाणे – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज झालेल्या सभेत ठाण्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडीची चांगलीच धुलाई केली. मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, विजेची समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, भ्रष्टाचार यासह प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली.

यावेळी राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांना देखील राज ठाकरे यांनी झापलं. ते म्हणाले, सगळे गुढी पाडव्याच्या सभेनंतर एकदम चरफडले. एकच पालुपद लावलं की ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले.

काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ*, चु* शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’… म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे.. शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं.असं म्हणत संजय राऊत यांची खिल्ली राज ठाकरे यांनी उडवली.