… तर केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊत यांचा दावा 

Mumbai –  महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न  (Maharashtra Karnataka Border Disputes) अजूनही सुटला नसताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी  खेळी खेळली जात आहे. महाराष्ट्राच्या सांगली (Sangli) जिल्ह्यातील जत (Jat) तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगितलं आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळी आहे. तिथे पाण्याची तीव्र टंचाई भासते. यामुळं तेथील 40  ग्रामपंचायतींनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. याच ठरावावर कर्नाटक सरकार विचार करत असल्याचं बोम्मई यांनी सांगितलं.दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकांच्या राज्यपालांदरम्यान समन्वय साधण्यासाठी बैठक झाली होती. एका बाजूला हे सकारात्मक प्रयत्न सुरु असताना कर्नाटक सरकारकडून हा वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

दरम्यान,ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटावर अत्यंत कडक भाषेत टीका केली आहे.ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आलेलं आहे, त्यामुळे देशातील अनेक राजकीय दरोडेखोरांना वाटतं आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो. शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. मुख्यमंत्री त्यावर काही बोलत नाही. या प्रकाराचं उपमुख्यमंत्री समर्थन करत आहेत. हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे राज्याराज्याचे हस्तक राहणार नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.