नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस.. मी पूर्ण नागडा करेन; संजय राऊत यांची डरकाळी 

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर (Narayan Rane) तोफ डागली आहे. ‘नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस.. झालं आता. मी कालपर्यंत गप्प होतो. यापुढे जर तो बोलत राहिला तर मी त्याला पूर्ण नागडा करेन.’ अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी यावेळी केली आहे.

‘हा राऊत वि. राणे हा संघर्ष वैगरे काही नाही. त्याला वेड लागलंय. तो वेड्यांच्या कळपात आहे तो. त्याची सटकलीय.. त्या नारायण राणेची. मी कालपर्यंत त्याचा आदराने उल्लेख करत होतो. जरी तो आमच्यावर टीका करत होता. मी त्याच्यावर एक शब्द बोललो नाही. पण कोण आहे हा माणूस.’असं म्हणत राणेंवर राऊत यांनी प्रहार केला आहे.