गाेपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खाेत यांनी घेतलेल्या भुमिकेचे संजय राऊत यांनी केले स्वागत

मुंबई : गेल्या 17 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक पगारवाढीनंतरही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठी घोषणा केल्यानंतरही संपावर तोडगा निघाला नाही.

दरम्यान, सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करणार असल्याची घोषणा केलीय.त्यानंतर आता आझाद मैदानावर सुरु असणारे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. दरम्यान, त पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी गाेपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खाेत यांच्या समजंस भुमिकेचे स्वागत  केले आहे.

एसटी कामगारांना दिले जाणारे वेतनवाढीचे पॅकेज हे उत्तम असल्याचे मत देखील संजय राऊत यांनी व्यक्त केले. गाेपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खाेत हे एसटी कर्मचारी संपातून बाहेर पडणार आहेत यावर या दाेन नेत्यांच्या समजंस भुमिकेचे स्वागत करताे. कूठे तरी संप चालू करणा-यांनी संप संपविण्यासाठीचा विचार करणे आवश्यक असते अन्यथा हजाराे कामगारांचे कुटुंब रस्त्यावर येतील अशी भीती खासदार राऊत यांनी व्यक्त केली.