ममतांच्या ‘युपीए अस्तित्वात आहेच कुठे?’ विधानावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ममतांच्या ‘युपीए अस्तित्वात आहेच कुठे?’ विधानावर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सतत देशभरात दौरे करत आहेत आणि बिगर काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप विरोधात जे लढतील त्या सर्वांना एकत्र घेणार असून यूपीए व्यतिरिक्त वेगळा पर्याय देणार असल्याचे ममता बॅनर्जींनी संकेत दिले आहेत.

यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, काँग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.ममता बँनर्जी म्हणाल्या होत्या की, काय आहे यूपीए? यूपीए आता उरली नाही. जो फिल्डमध्ये राहून, तळागाळात उतरुन लढू शकतो तो स्ट्राँग विरोधक. जो लढतच नाही त्याला आम्ही काय म्हणणार? असा खोचक सवाल देखील त्यांनी विचारला आहे.

दरम्यान ममता बॅनर्जींच्या या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.“जसं युपीए अस्तित्वात नाही म्हणतात तसंच एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे आहे? शिवसेना, अकाली दल बाहेर पडले असून इतर पक्षही बाहेर पडत आहेत. एकेकाळी आम्ही एनडीएत होतो. युपीए मजबूत करण्याची गरज आहे हे सत्य,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=lvBreeXrISM

Previous Post
chandrkant jadhav

कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

Next Post
अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने ममता बॅनर्जींविरोधात पोलिसात तक्रार

अर्धवट राष्ट्रगीत गायल्याने ममता बॅनर्जींविरोधात पोलिसात तक्रार

Related Posts
मंत्रिमंडळच्या विस्ताराचे वेध : बच्चू कडूंनी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याची तारीखच सांगून टाकली

मंत्रिमंडळच्या विस्ताराचे वेध : बच्चू कडूंनी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल याची तारीखच सांगून टाकली

Bacchu Kadu – राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निकाल काल जाहीर झाला. त्यानुसार राज्यातल्या एकनाथ शिंदे (Eknath…
Read More
MNSला पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी किती आमदार निवडून यावे लागणार?  

MNSला पक्षाची मान्यता टिकवण्यासाठी किती आमदार निवडून यावे लागणार?  

MNS :- राज्यात एकाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं…
Read More
आपल्याच पक्षाला आरसा दाखवणे कॉंग्रेसच्या आमदाराला पडले महागात; पक्षाने उगारला कारवाईचा बडगा 

आपल्याच पक्षाला आरसा दाखवणे कॉंग्रेसच्या आमदाराला पडले महागात; पक्षाने उगारला कारवाईचा बडगा 

Rajasthan Politics: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आपल्याच सरकारवर टीका केल्याने  काँग्रेस नेते राजेंद्र गुडा…
Read More