Sanjay Raut | ‘जनतेनं मोदींविरोधात कौल दिला आहे,मोदींची हुकूमशाही नाकारली आहे’

Sanjay Raut | दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री शुक्रवारी (21 जून) तिहार तुरुंगातून बाहेर येऊ शकतात. बार आणि खंडपीठाच्या अहवालानुसार, ईडीने कोर्टाला जामीन बाँडवर स्वाक्षरी करण्यासाठी 48 तासांची वेळ मागितली जेणेकरून आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर, 10 मे रोजी त्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला. आता, अटकेच्या 91 दिवसांनंतर, राऊस एव्हेन्यूने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, या घडामोडींवर शिवसेनाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले, शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधतान राऊतांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत मोदी- शाह यांच्यावर निशाणा साधला. ‘मोदी आणि शाह यांनी ज्या पद्धतीनं ईडी आणि सीबीआयला हाताशी घेत लोकशाहीचं हत्यार केलं, त्यांनी किमान आतातरी समजावं की, देशातील जनतेनं मोदींविरोधात कौल दिला आहे. मोदींची हुकूमशाही नाकारली आहे. त्यामुळं त्यांना, या यंत्रणांना आता सुधरावं लागेल’, असा इशारा राऊतांनी दिला.

अरविंद केजरीवाल अद्यापही दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदी असताना अटक केली होती, पण त्यांनी राजीमाना दिलेला नाही. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन आणि दिल्लीचे इतर मंत्री आणि मुंबई, महाराष्ट्रतही ईडी आणि सीबीआयनं इतरांना अडकवलं असलं तरीही अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनं मात्र आता या यंत्रणांना चपराक लगावली आहे, असं राऊत चढ्या स्वरात म्हणाले. केजरीवालांची अटक बेकायदेशीर असल्याचा निकाल न्यायालयानंच दिल्याची बाब त्यांनी यावेळी अधोरेखित केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like