ईडीच्या ताब्यात असणाऱ्या संजय राऊत यांची संपत्ती आहेत तरी किती ?

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून (ED) अटक करण्यात आली आहे. पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना राऊत यांनी त्यांच्या संपत्तीची माहिती दिली होती. आपल्याकडे १ लाख ५५ हजार ७७२ रुपये रोकड असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं. बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रुपये असल्याचं राऊतांनी सांगितलं होतं. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे ७२९.३० ग्रॅम सोनं आहे. दागिन्यांची किंमत ३९ लाख ५९ हजार ५०० रुपयांच्या घरात जाते. राऊतांच्या पत्नीकडे १८२० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत. त्यांची किंमत ३० हजार रुपयांच्या आसपास आहे.(Property of Sanjay Raut)

राऊतांच्या नावे बँकेत ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात राऊतांचं उत्पन्न २७ लाख ९९ हजार १६९ रुपये होतं. तर त्यांच्या पत्नीची कमाई २१ लाख ५८ हजार ७९० रुपये होती. दादर, अलिबाग, पालघर अशा भागांमध्ये राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे फ्लॅट आणि प्लॉट असल्याचं समजतं. काल ईडीनं राऊतांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपये जप्त केले. त्याआधी ए्प्रिलमध्ये ईडीनं राऊत यांची ११.५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. राऊत यांचा दादरमधील फ्लॅट ईडीनं सील केला होता.महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.