Sanjay Raut | राज्यातल्या ‘महायुती’ सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अतिशय लोकप्रिय होत असून या योजनेसाठी पुरेसा निधी उपलब्ध आहे.मात्र विरोधकांकडून सातत्याने संभ्रम पसरवण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे.
महायुती सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना पुरेसा विचार करून आणि निधी उपलब्ध करूनच जाहीर केली आहे.कोणतीही शंका मनात न ठेवता महिलांनी कागदपत्रांची पूर्तता करावी आणि महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सत्ताधारी करत असताना विरोधक मात्र या योजनेबाबत संभ्रम पसरवत असल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.
महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहीण योजनेसाठी (CM Ladki Bahin Yojana) राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :