संजय राऊत साडेतीन तर मी पावणे पाच लोकांची नावे इडीला देणार – रवी राणा
मुंबई : खासदार संजय राऊत हे शिवसेना भवन येथे ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पत्रकार परिषदेत संजय राऊत हे भाजपच्या साडेतीन लोकांची नावे जाहीर करणार आहे. त्यामुळे त्यांच्या कडे आता सगळ्याचं लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी देखील संजय राऊत यांना इशारा दिला आहे.
शिवसेनेची पत्रकार परिषद झाल्यानंतर महाविकास आघाडीची देखील पत्रकार परिषद होणार आहे. संजय राऊत हे भाजपच्या साडेतीन नेत्यांमध्ये गौप्यस्फोट करणार आहेत. यावर बोलताना रवी राणा म्हणाले की, संजय राऊत आज पत्रकार परिषदमध्ये साडेतीन लोकांची नावे जाहीर करणार असतील तर मी शिवसेनेच्या पावणे पाच लोकांची नावे सीबीआय ईडीला देणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण सध्या अधिक तापण्याची शक्यता आहे.
आज सायंकाळी ४ वाजता शिवसेनेची बहुचर्चित पत्रकार परिषदेत पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि हजारो लोक सहभागी होणार आहेत. काल खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे होणाऱ्या पत्रकार परिषदच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यामुळे संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.
पत्रकार परिषदेत पुर्वी ते म्हणाले की, आजची पत्रकार परिषद विरोधक आणि तपास यंत्रणांनी बघायला हवी, असा इशारा ही संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे. आज समजले की महाराष्ट्र काय आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना जी मर्दानगी शिकवली ती मर्दानगी दिसेल. कुणीही उठावं आणि महाराष्ट्राची बदनामी करावं. हे चालणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय.