दिवस फिरले : तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले

मुंबई : तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. (Sanjay Raut latest news)

या चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या डोक्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी राऊतांच्या बंगल्यासमोर मोठी गर्दी केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते जोरदार घोषणा देत आहेत.