साहेब मुतायचे वांदे झालेत म्हणणाऱ्या कार्यकर्त्याला संजय शिरसाट यांनी दिले ‘हे’ भन्नाट उत्तर, क्लिप व्हायरल

मुंबई – आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आले आहे. यामुळे ते सतत माध्यमांमध्ये चर्चेत असताना शिरसाट यांच्या एका कार्यकर्त्याने मुतारी बांधण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी झालेलं संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे.

काल मंत्रिमंडळ विस्ताराच्या गडबडीत आमदार संजय शिरसाट यांना एका कार्यकर्त्याचा अचानक फोन आला. कार्यकर्त्याने मुतारी बांधा असं शिरसाट यांना सांगितलं. तसेच मुतायचे लय वांदे हायत अशी तक्रार केली. यावर शिरसाट यांनी माझ्या इथे येऊन करं असं उत्तर दिलं.

हा कार्यकर्ता त्यांच्या मतदारसंघातला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच काल अधिक गोंधळ असल्याने शिरसाट यांनी आमचं चाललंय काय तू विचारतोयस काय असं म्हणत माझ्याकडे येऊन कर असं उत्तर दिलं. त्याचं फोन रेकॉर्डींग प्रचंड व्हायरल झालं असून त्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.