‘संजय राऊत यांच्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार एक नंबरला असायला पाहिजे’ 

Aurangabad :  राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे (MVA) तीन उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण, महाविकास आघाडीची अनेक मते फुटली असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली असून सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय (BJP’s Dhananjay Mahadik’s victory) झाला आहे. विरोधीपक्ष नेते  देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेल्या खेळीला यश आले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने सहापैकी तीन जागा जिंकल्या, तर भाजपाला तीन जागा मिळाल्या. भाजपाच्या विजयी उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी राज्यमंत्री अनिल बोंडे आणि पक्षाचे नेते धनंजय महाडिक यांचा समावेश आहे.राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी आणि शिवसेनेचे संजय राऊत हेही राज्यसभेवर निवडून आले आहेत. शिवसेनेला राज्यसभा निवडणुकीत भाजपाने धूळ चारली आणि शिवसेनेची पुरती नाचक्की झाली.

दरम्यान, आता मंत्री  अब्दुल सत्तारांनी आम्हाला राज्यसभा निवडणुकीत मदत केली असा गौप्यस्फोट भाजप आमदार संतोष दानवेंनी केलाय. संजय राऊत यांच्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार एक नंबरला असायला पाहिजे असंही ते म्हणाले. मविआला संतोष दानवे मतदान करणार असं सत्तार यांनी म्हटलं होतं.यावर उत्तर देताना सत्तारांनी भाजपला मदत केल्याचा पलटवार संतोष दानवेंनी केला.