Santosh Deshmukh Murder Case | केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने मराठवाड्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्याकांडाला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला असला, तरी आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे.
या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडवरही मकोका लागू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील आणखी एक प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार असून, त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) तपास गतीमान करण्यासाठी पोलीस, एसआयटी आणि सीआयडी या यंत्रणा काम करत आहेत. बीड जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्यांच्या मागणीनंतर एसआयटीची स्थापना करण्यात आली, तसेच तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला. त्यामुळे तपासाला वेग आला आहे.
या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.
कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्याला फरार घोषित करण्यात आले असून, त्याच्या मालमत्तेवर जप्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, तपासयंत्रणा आरोपींना कठोर शिक्षा होईल यासाठी आक्रमकपणे काम करत आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, ‘शीशमहल’ प्रकरणी CVC चे चौकशीचे आदेश