संतोष शिंदे यांची संभाजी ब्रिगेडच्या सातारा जिल्हा ‘संपर्क प्रमुख पदी’ निवड…

Santosh Shinde and sambhaji brigade

पुणे – मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे संभाजी ब्रिगेड ची केंद्रीय कार्यकारिणी ची बैठक संपन्न झाली या बैठकीचे नेतृत्व संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष ॲड मनाेज आखरे व प्रदेश महासचिव साैरभदादा खेडेकर यांनी केले, तर विचारपीठावर संभाजी ब्रिगेड चे प्रदेश कार्याध्यक्ष(प्रशासन) डॉ गजानन पारधी, प्रदेश कार्याध्यक्ष (उपक्रम) सुधीर देशमुख, प्रदेश काेषाध्यक्ष संताेष गाजरे,प्रदेश उपाध्यक्ष डॉ प्रदीप तुपेरे, प्रदेश प्रवक्ते प्रा डॉ शिवानंद भानुसे, संघटन सचिव डॉ संदीप कडलक प्रवक्ते प्रा प्रेमकुमार बाेके, प्रदेश संघटक डॉ सुदर्शन तारख यांची उपस्थिती होती.

संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक व नेते संतोष शिंदे यांची ‘सातारा जिल्हा संपर्क प्रमुख’ म्हणून प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे आणि महासचिव सौरभदादा खेडेकर यांनी काल जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे संपन्न झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नियुक्तीपत्र देऊन निवड केली.

‘संभाजी ब्रिगेड’ च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर व माझ्या कामावर विश्वास ठेवून माझी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख’ म्हणून नियुक्ती केली आहे, त्याबद्दल सर्वांचे आभार. संपूर्ण जिल्ह्यात ‘संभाजी ब्रिगेड’चे चांगल्या पद्धतीने वादळ निर्माण करून सर्व समावेशक जास्तीत जास्त नवीन लोकं जोडण्याचा व संघटन वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. चांगले काम करून राज्यात एक नंबरचा जिल्हा करण्याचे काम करू. यासाठी सर्वांचे सहाकार्य अपेक्षित आहे… असे मत संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

या बैठकी मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष व महानगर अध्यक्ष यांनी आपआपल्या जिल्ह्यातील अहवाल सादर केले व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अापले कीती उमेदवार राहतील या विषयावर प्रकाश टाकला, तसेच या बैठक मध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले जसे संभाजी ब्रिगेड चे या वर्षी चे राज्य अधिवेशन हे मुंबई येथे घेण्यावर एकमत हाेऊन अधिवेशन भव्य प्रमाणात साजरे करण्यासाठी जिल्हा अध्यक्ष व महानगर अध्यक्ष यांना मान्यवरांनी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच संभाजी ब्रिगेड च्या केंद्रीय पदाधिकारी यांना काेर कमेठी ने ठरवून दिल्या प्रमाणे आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात येऊन पदाधिकारी यांना जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या देण्यात अाल्या. तसेच गाव पातळीपर्यंत पक्ष संघटना वाढीसाठी व जिल्हा निहाय पक्षाच्या प्रशिक्षीत वक्त्यांची फळी निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग (कॅडर कॅम्प/ट्रेनिंग सेंटर) राबविण्यावर विषेश चर्चा करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोजदादा आखरे व महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनचे (चालते रुग्णालय) लोकार्पण करण्यात आले. हे चालते रुग्णालय बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन लोकांच्या रक्ताच्या चाचण्या, ECG चाचणी व प्रथोमपचार करतील.

साप्ताहिक संभाजी ब्रिगेड ची अधिकृत वेबसाईट लॉन्च करत डिजिटल स्वरूपात मोठ्या प्रमाणात काम सुरू झाले आसल्याची सर्व माहिती संपादक मंडळाच्या वतीने संगमेश्वर लांडगे यांनी उपस्थित राज्य कार्यकारणी व महाराष्ट्रातील सर्व विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व महानगरअध्यक्ष यांना दिली.

सदर बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे, प्रदेश संघटक तुषार उमाळे, प्रदेश संघटक संताेष शिंदे, प्रदेश संघटक अतुल गायकवाड, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उमाकांत उफाडे, केंद्रीय सदस्य शशिकांत कन्हेरे, लातुर विभागिय अध्यक्ष राहुल वायकर, नागपुर विभागिय अध्यक्ष अभिजित दळवी, मुंबई विभागिय अध्यक्ष दीनेश महाडीक यांच्या सह सर्व जिल्हा अध्यक्ष व महानगर अध्यक्ष उपस्थित होते, बैठक यशस्वी पणे संपन्न हाेण्यासाठी याेगेश पाटील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष (उत्तर) व रामेश्वर वायाळ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) यांनी परिश्रम घेतले.

Previous Post
Ramdas Athavale

डोंबिवली बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबियांना रामदास आठवले यांनी केली 1 लाखांची मदत

Next Post
Pankaj Tripathi

लालूंच्या सरकार विरोधात आंदोलन केल्याने पंकज त्रिपाठी यांना खावी लागली होती जेलची हवा 

Related Posts
शिंदे सरकारवर उद्योजकांचा विश्वास वाढला; राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक

शिंदे सरकारवर उद्योजकांचा विश्वास वाढला; राज्यात हिंदुजा समूह करणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई – महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला जगभरातील विविध उद्योजकांसह उद्योग…
Read More
बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद भाजपची पिल्लं आहेत; संजय राऊत यांचा निशाणा

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद भाजपची पिल्लं आहेत; संजय राऊत यांचा निशाणा

Sanjay Raut | महाराष्ट्रात औरंगजेबच्या कबरीवरून मोठा वाद उफाळला आहे. बजरंग दलाने “महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर सरकारने हटवली नाही,…
Read More
सारा तेंडुलकरसोबत नाही तर शुभमन गिल 'या' अभिनेत्रीसोबत लंडनमध्ये फिरतोय

सारा तेंडुलकरसोबत नाही तर शुभमन गिल ‘या’ अभिनेत्रीसोबत लंडनमध्ये फिरतोय

Shubman Gill-Sara Tendulkar: बॉलिवूडमध्ये ब्रेकअप, पॅचअप आणि अफेअर्सची नेहमीच चर्चा असते. त्यांच्या अफवा वणव्यासारख्या पसरतात. आजकाल सारा तेंडुलकर…
Read More