प्रकरण चिघळलं! ‘त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला’, सपना गिलचे पृथ्वी शॉवर गंभीर आरोप

मुंबई- भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या सेल्फी प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. पृथ्वी शॉबरोबर केलेल्या कथित गैरवर्तन आणि गाडीवर बेसबॉल बॅटने हल्ला केल्याप्रकरणी सपना गिल (Sapna Gill) आणि तीन आरोपींना मुंबईतील एका स्थानिक कोर्टाने जामिन मंजूर केला आहे. जामिनावर बाहेर येताच सपना गिलने पृथ्वी शॉच्या अडचणी वाढवायला सुरुवात केली आहे. तिने पृथ्वी शॉविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करण्यात आली आहे. याबरोबरच सपनाने पृथ्वी शॉवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत.

संपूर्ण घटनाक्रम सांगत सपना गिल म्हणाली, आम्ही पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्रांना विमानतळावर थांबवण्याचा प्रयत्न केला. पृथ्वी आणि त्याच्या मित्राने जमावाला बोलावून पळण्याचा प्रयत्न केला. ते आक्रमक आणि मद्यधुंद होते. त्यांनी आमची माफी देखील मागितली. पण 16 फेब्रुवारीला मला कळले की माझ्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, म्हणून मी 20 फेब्रुवारीला तक्रारही दाखल केली असे सपना गिलने सांगितले.

तसेच गंभीर आरोप करताना तिने म्हटले, “मी तिथे जाऊन त्यांना थांबवले. माझ्या मित्राने पुरावा दाखवण्यासाठी व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी मला बेसबॉल बॅटने मारहाण केली. एक किंवा दोन लोकांनी मला मारले आणि माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आणि मला कानाखाली मारली.”

https://youtu.be/MGtb68M60oY