सपनाने करण देओलला दिली मसाजची ऑफर

मुंबई : कपिल शर्मा शोचे प्रत्येक कलाकार अतरंगी आहेत. पण नालासोपाऱ्याच्या स्वप्नाला काय म्हणावे. सपना जेव्हा कधी स्टेजवर येते तेव्हा हसून हसून लोकांची वाईट अवस्था होते. असाच काहीसा प्रकार या वीकेंडला घडला, जेव्हा सनी देओल कपिल शर्माच्या शोमध्ये मुलगा करण देओलच्या ‘वेले’ या चित्रपटाच्या स्टार कास्टसोबत पोहोचला.

आता जेव्हा शोमध्ये इतके मोठे स्टार्स आले आणि सपना त्यांना भेटणार नाही, असे कसे होऊ शकते. तर सपना स्टेजवर आली आणि करण देओलला असा मसाज ऑफर केला की तुम्ही तुमचे हसु अडवू शकणार नाही.

रविवारी कपिल शर्मा शोमध्ये सनी देओल मुलगा करण देओलच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. या चित्रपटात सनी स्वतःही काम करत आहे. वेले असे या चित्रपटाचे नाव आहे. त्यामुळे सपना स्टेजवर आल्यावर तिने करण देओलला फक्त मसाज दिला. हा मसाज कसा करायचा हे ऐकून तुमचेही होश उडून जातील.

सपनाने सांगितले की, या मसाजमध्ये ते आधी ग्राहकाला तेल लावतात आणि नंतर दोन तास सोडून देतात. यानंतर ते ग्राहकाला समुद्रकिनारी घेऊन जातात आणि वाळूवर सोडतात. जिथे व्हेल मासा येतो आणि ग्राहकाला मसाज करतो, जेव्हा सर्वांनी या मसाजबद्दल ऐकले तेव्हा ते हसून हसून लोटपोट झाले.

शोमध्ये अनेक खुलासे झाले, करण देओल आणि सनी देओल कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले आणि अनेक नकळत किस्सेही यावेळी ऐकायला मिळाले. यावेळी असे समजले की डर चित्रपटात सनी देओल आणि जुही चावला यांच्यावर चित्रित केलेला एक रोमँटिक सीन पाहून करण देओल लहानपणी जोरजोरात रडू लागला होता. पल पल दिल के पास या चित्रपटातून करण देओलने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आता त्याचा दुसरा चित्रपट ‘वेले’ प्रदर्शित होत आहे.