सारा अली खान (Sara Ali Khan) तिची आजी शर्मिला टागोर यांच्यासोबत आपले बालपण घालवू शकली नसली तरीही शर्मिला टागोर या तिच्या गरजेच्या वेळी तिच्यासाठी नेहमीच उपलब्ध होत्या. साराने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, नातेसंबंध फक्त वाईट काळातच ओळखले जातात. तिची आई अमृता सिंग या पती सैफ अली खान पासून विभक्त झाली असली तरी शर्मिला टागोर यांनी त्यांना खऱ्या आईप्रमाणे वाईट काळात साथ दिली.
बडी अम्मा यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला
सारा अली खानने (Sara Ali Khan) टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, तिचे आई-वडील एकत्र राहत नसले तरी आजी शर्मिलाचे तिच्या आईसोबतचे नाते खूप चांगले आहे. साराने सांगितले, माझ्या आईला आई-वडील नाहीत. पण मला किंवा इब्राहिमला काही झाले तर मला माहित आहे की ती एकटी राहणार नाही. कारण बडी अम्मा (शर्मिला) तिच्यासोबत असेल आणि तेच माझ्यासाठी सर्व काही आहे.
वाईट वेळी नाती ओळखली जातात
साराने सांगितले की, जेव्हा एखाद्याला आयुष्यात यश मिळते तेव्हा अनेक चीअरलीडर्स मिळतात पण जेव्हा आधाराची गरज होती तेव्हा आजी सोबत होती. सारा म्हणाली, मी माझ्या आयुष्यातील त्या टप्प्यातूनही गेले आहे जेव्हा आधाराची गरज होती आणि त्यावेळी बडी अम्मा सैन्याप्रमाणे आल्या होत्या. ती माझ्यासोबत होती. अशा वेळी तुम्हाला खरे नातेसंबंध सापडतात. शर्मिला टागोरनेही कॉफी विथ करणमध्ये सांगितले आहे की, जेव्हा अमृता वेगळी झाली तेव्हा त्या स्वत: आणि त्यांचे पती टायगर पतौडी खूप नाराज होते. मुलांबरोबरच त्यांनाही आपली सून आपल्याला सोडून गेल्याचे दु:ख झाले होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप