परळी | परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील (Sarpanch Bapu Andhale Case) फरार आरोपी बबन गित्तेवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तब्बल आठ महिन्यांपासून तो फरार असून, पोलिसांनी त्याला अधिकृतरित्या फरार घोषित केले आहे. आता त्याच्या संपत्ती जप्तीची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांकडून बबन गित्तेच्या संपत्तीचा तपशील गोळा करण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांत न्यायालयाकडे संपत्ती जप्त करण्यासाठी परवानगी मागितली जाणार आहे. एकदा परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या संपत्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
बबन गित्ते गेल्या आठ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असून, अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवूनही तो सापडलेला नाही. मात्र, संपत्ती जप्तीची कारवाई सुरू झाल्यास त्याच्यासाठी शरणागती हाच एकमेव पर्याय राहणार आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
बापू आंधळे हत्या प्रकरणानंतर (Sarpanch Bapu Andhale Case) या प्रकरणात सातत्याने नवे अपडेट समोर येत असून, आता बबन गित्तेवर मोठी कारवाई होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींवर लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध | Ramdas Athawale
‘फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील’
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,…