Satish Kaushik Passed Away: सतीश कौशिक कुटुंबासाठी मागे किती संपत्ती सोडून गेले? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. सतीश कौशिक यांनी नुकतेच होळी खेळतानाचे फोटो शेअर केले असून त्याचा आनंद लुटताना दिसले होते. मात्र होळीच्या दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आणि वयाच्या ६६ व्या वर्षी या ज्येष्ठ कलाकाराने अखेरचा (Satish Kaushik Passed Away) श्वास घेतला.

सतीश कौशिक यांनी १००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. त्यांनी आधीच आपला दोन वर्षांचा मुलगा गमावला होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात फक्त पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका आहेत. या अभिनेत्याने आपल्या कुटुंबासाठी करोडोंची संपत्ती मागे (Satish Kaushik Net Worth) सोडली आहे.

सतीश कौशिक यांनी ८०च्या दशकात त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती आणि आतापर्यंत ते चित्रपटांमध्ये काम करत होते. सतीश यांनी आपल्या ४ दशकांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले. त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. याशिवाय, वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, ते काही व्यवसायातूनही पैसे कमवत असे. सतीश कौशिक आता या जगात नाहीत, परंतु अहवालांवर विश्वास ठेवला तर त्यांनी आपल्या कुटुंबासाठी सुमारे ५० कोटी रुपयांची मालमत्ता सोडली आहे.

सतीश कौशिक यांची कारकीर्द
अभिनेत्याचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड, पंजाब येथे झाला होता. त्यांनी दिल्लीच्या करोरीमल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले होते. यानंतर त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून कलेचे बारकावे शिकले होते. हे त्यांच्या कारकिर्दीत कामी आले. म्हणूनच सतीश कौशिक हे केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक उत्तम चित्रपट लेखक, संवाद लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही ओळखले जातात.

सतीश यांनी १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारों’ या कॉमेडी चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगबद्दल त्यांचे कौतुक झाले आणि चित्रपटांमध्येही अशाच भूमिका मिळाल्या. वो सात दिन, मंडी, जलवा, जमाई राजा, स्वर्ग, साजन चले ससुराल, मिस्टर इंडिया, आंटी नंबर 1, हसीना मान जायेगी यासह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते.