मेरठच्या सौरभ राजपूत हत्याकांडात (Saurabh Rajput case) नवीन खुलासे समोर येत असून, पोलिसांनी आरोपी मुस्कानची आई कविता रस्तोगी हिचा तपास सुरू केला आहे.
कविता रस्तोगी कॅमेऱ्यासमोर आपल्या मुलीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होती. मात्र, पोलिसांच्या तपासात सौरभ आपल्या सासूच्या बँक खात्यात पैसे पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे पैसे कधी आणि कशासाठी वापरण्यात आले, याचा तपास सुरू आहे.
आधी कविता रस्तोगी सौरभची बाजू घेत (Saurabh Rajput case) होती. मात्र, सौरभच्या कुटुंबीयांनी तिलाही पैसे घेतल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. आता कविता संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
देवेंद्र फडणवीस आणि बिल गेट्स यांची मुंबईत बैठक; ‘या’ विषयांवर झाली चर्चा